Nitesh Rane: नितेश राणे अटकेनंतर ही तुरुंगात निवांत,  पुस्तक वाचतानाचा फोटो व्हायरल …

Nitesh Rane: नितेश राणे अटकेनंतर ही तुरुंगात निवांत, पुस्तक वाचतानाचा फोटो व्हायरल …

Published by :
Published on

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी (Santosh Parab attack case) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवली कोर्टाबाहेर मोठा पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.

अशातच सध्या सोशल मीडियावर नितेश राणे (nitesh rane) यांना तुरुंगात बसून पुस्तक वाचतानाचे एक छायाचित्र व्हायरल (photo viral) होत आहे. या छायाचित्रात तुरुंगातील कोठडीचे लोखंडी गज आणि त्यापलीकडे बसलेले नितेश राणे (Nitesh Rane) स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे संतोष परब हल्लाप्रकरणात अटक होण्यापूर्वी अज्ञातवासात गेलेले नितेश राणे तुरुंगात आल्यानंतर इतके निवांत कसे, असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

मात्र, काहीवेळातच या छायाचित्रामागील खऱ्या कहाणीचा उलगडा झाला. हे नितेश राणे यांचेच छायाचित्र आहे, परंतू ते पाच वर्षांपूर्वीचे आहे. पाच वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळूच्या प्रश्नावरुन राडा केला होता. त्यावेळी नितेश राणे यांना अटक झाली होती. तेव्हा नितेश राणे यांचे हे छायाचित्र टिपण्यात आले होते.

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत आमदार नितेश राणेंसह अन्य संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com