महाराष्ट्र
महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी! नवी नियमावली जाणून घ्या
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे.दररोज रूग्णसंख्या नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत नागरीकांवर निर्बंध घालण्यात आली आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. उद्या मध्यरात्री पासून नवे नियम लागू होणार आहेत. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.
नवीन नियमावली
- जिम, स्पा पूर्णपणे बंद
- नाट्यगृह सिनेमागृहात, सलून मध्ये 50 टक्के उपस्थिती
- उद्या मध्यरात्री पासून नवे नियम लागू
- रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यु
- मैदान, उद्याने आणि पर्याटनस्थळे बंद
- थिएटर, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
- स्वीमिंग पुल, स्पा पुर्णपणे बंद
- शाळा, कॉलेज 15 फ्रेबुवारी पर्यंत बंद
- हॉटेल आणि रेस्टॉरट 50 टक्के क्षमतेने 10 पर्यंत चालू राहणार
- लोकल वाहतूकीवर निर्बंध नाही