महाराष्ट्र
ठाणे जिल्ह्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर; पाहा काय बंद काय सुरु राहणार ?
ठाणे जिल्ह्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नवीन नियमावलीनुसार दुकानं सोमवार ते शनिवार रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्याचा कोविड पॉझीटीव्हीटी रेट १.७६ % आहे, तर ऑक्सिजन बेडची क्षमता ९.२६ % इतकी आहे. अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
नवी नियमावली
- सोमवार ते शनिवार रात्री १० पर्यंत राहणार दुकान सुरु
- विवारी पार्सल सुविधा वगळता पुर्ण दिवस दुकान राहणार बंद
- मॉल्स,चित्रपट गृह आणि नाट्यगृह पुढील आदेश येईपर्यंत राहणार बंद
- ५०% च्या क्षमतेने हॉटेल व बार रेस्टॉरंट संध्याकाळी ४ पर्यंत असणार सुरु
- खाजगी व सरकारी आस्थापना १००% च्या क्षमतेने राहणार सुरु