MPSC
MPSCTeam Lokshahi

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश! नवीन अभ्यासक्रम 2025 पासूनच; आयोगाची घोषणा

गेल्या चार दिवसापासून उपोषण पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते.
Published on

पुणे : एमपीसीचे नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु होते. याला अखेर यश मिळाले असून एमपीएससीचे नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात येईल, असे ट्विट एमपीएससी आयोगाने केले. यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

MPSC
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आम्ही शत्रू...; फडणवीसांचे मोठे विधान

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आलं होते. याविरोधात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात जोरदार आंदोलन केले होते. परंतु, मागण्या पूर्ण होत नसल्याने पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाची दखल शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही घेतली होती.

यानंतर अखेर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणीआयोगाने मान्य केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे, असे आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, यावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांची जी न्याय्य मागणी होती ती आज मान्य झाली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि आमच्या युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांचे मी त्यासाठी अभिनंदन करतो. समजूतदारपणे सरकार आणि एमपीएससी आयोग यांनी ही परिस्थिती हाताळली असती तर चार दिवस युवकांना रस्त्यावर संघर्ष करावा लागला नसता, असे थोरातांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com