राज्यात नवे कडक निर्बंध लागू

राज्यात नवे कडक निर्बंध लागू

Published by :
Published on

राज्यात कोरोनाचे संकट जरी कमी होत असले तरी राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागलाय. त्यामुळं राज्य सरकारकडून कोरोना नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.

महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारनं हे पाऊल उचललंय. आजपासून दुपारी चारनंतर राज्यभरात हे निर्बंध लागू होणार आहेत, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल.

कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या सर्व जिल्ह्यांचा लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आलाय… त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत, त्यामुळे आजपासून दुपारी चारनंतर राज्यभरात हे निर्बंध लागू होणार आहेत, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल.

काय सुरू काय बंद?
मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद
रेस्टॉरंट, बार, हॉटेल 4 वाजेपर्यंत सुरू
हॉटेल शनिवार रविवार पूर्णपणे बंद
उद्यानं, मैदानं पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत खुली
खासगी कार्यालयं 50 टक्के क्षमतेने सुरू
अत्यावश्यक सेवा शंभर टक्के क्षमतेने सुरू
लग्नसमारंभाला 50 लोकांना परवानगी
अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीला 20 लोकांना परवानगी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com