वाहतूक कोंडी सूटणार ? पालघर, मुंबई, ठाण्यासाठी नवीन नियमावली

वाहतूक कोंडी सूटणार ? पालघर, मुंबई, ठाण्यासाठी नवीन नियमावली

Published by :
Published on

नमित पाटील, पालघर | पालघर – मुंबई – ठाण्यातील महामार्गावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या वाहनधारकांना भेडसावत असते, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पालघर – मुंबई – ठाण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली जाहीर झाली आहे. या नव्या नियमानूसार उत्तरेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या अवजड वाहनांसाठी ठराविक काळातच मुंबई ठाण्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तर सकाळी 10 ते दुपारी 4, तर संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजता पर्यंतच अवजड वाहनांना प्रवेश असणार आहे.

इतर वेळेत महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत पालघरमध्ये वाहनतळ असणार आहे. मागील आठवड्यात पालघर मध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती वाहनतळांची पाहणी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com