चिपळूणात खळबळ! मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला

चिपळूणात खळबळ! मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला

मुंबईच्या टीमला पाचारण, मोठ्या प्रमाणत पोलिस बंदोबस्त
Published on

निसार शेख | चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी २.४५ वाजता हा पूल लॉंचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. नागरिक करत गर्डरमधील स्टीलसह काँक्रीट देखील तुटले.

चिपळूणात खळबळ! मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला
मीरा बोरवणकरांच्या आरोपांची हायकोर्टच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा : नाना पटोले

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख नका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वात मोठा उड्डाणपूल असून सुमारे १.८१ कि.मी. इतकी या पुलाची लांबी आहे. तर ४६ पिलर त्यासाठी उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील बहादूरशेख येथून पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू होते.

मात्र, नव्याने चढविलेले गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता काम सुरू असतानाच खचले. यावेळी मोठा आवाज झाला झाला. या घटनेमुळे आधीच चिपळूणकर धास्तावले असताना सोमवारी दुपारी २.४५ वाजता गर्डर उभारण्यासाठी वरती ठेवलेल्या लॉंचरसह नवीन पूल कोसळला. या घटनेवेळी मोठा आवाज झाला आणि जणू परिसरातील नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

बहाद्दूर शेख नाक्यावर एकच धावपळ उडाली. वाहन चालकांसह नागरिकांनी देखील अक्षरशः धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, बहाद्दूर शेख नाक्यावर प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली असून नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असून दोन्ही बाजूनी वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करून हळूहळू वाहने सोडली जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com