महाराष्ट्र
MLA disqualification: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 15 फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला होता. या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे.
याचबरोबर राष्ट्रवादीने नागालँडमधील आमदार प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 8 जुलैला सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली होती.
न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमुर्ती भूयान यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज न्यायालय विधानसभाध्यक्षांना नोटीस बजावण्याची शक्यता आहे.