sharad pawar
sharad pawar

राष्ट्रवादीतील बडे नेते ‘सिल्व्हर ओक’वर

Published by :
Vikrant Shinde
Published on

पाच राज्यांतील निवडणूकांचे निकाल भाजपच्या (BJP) बाजूने लागल्यानंतर महाराष्ट्रात येवू घातलेल्या निवडणूकांच्या (Upcoming Elections in Maharashtra) पार्श्वभूमीवर आता सर्व पक्ष कंबर कसून तयारीला लागल्याचे पाहायला मिळतंय.

आज राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) ह्यांच्या मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील आगामी निवडणूकांसदर्भातील रणनीती ठरविण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्याशिवाय, महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन-ड्राईव्ह बाँब या विषयावरही चर्चा होऊ शकते.

ह्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रमुख नेतेही उपस्थित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com