कंगणा रणौत विरोधात राष्ट्रवादी आक्रमक; भिवंडीत पोस्टरला जोडे मारो आंदोलन

कंगणा रणौत विरोधात राष्ट्रवादी आक्रमक; भिवंडीत पोस्टरला जोडे मारो आंदोलन

Published by :
Published on

अभिजीत हिरे, भिवंडी | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. या विधानावरून आता तिच्या विरोधात सर्वत्र टीका होत असून अनेक पोलिस ठाण्यात तक्रार आणि आंदोलने सूरू आहेत. त्याप्रमाणे आज भिवंडीत राष्ट्रवादी महिलांनी कंगणा रणौतच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले.

बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत हिने मागील आठवड्यात एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत 1947 मध्ये मिळालेले स्वतंत्र हे भीक असून खरे स्वतंत्र 2014 मध्ये मिळाले असे वक्तव्य केल्याने संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही, असा दावा कंगनाने केला आहे. कंगनाच्या या विधानावर आता काँग्रेसने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत कायदेशीर कारवाई करणार आहे.

दरम्यान काँग्रेससोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आक्रमक झाली आहे. भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यानी कंगणा राणावत हिच्या पोस्टरला जोडे मारीत पोस्टर पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com