माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार, पोलिसांच्या C-60 दलाला मोठं यश

माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार, पोलिसांच्या C-60 दलाला मोठं यश

Published by :
Published on

गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिलिंद तेलतुंबडेवर 50 लाखाचा इनाम होता. दरम्यान हे पोलिसांना आलेले मोठे यश आहे.

धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला असल्याची माहिती मिळतेय. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आलेय. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com