नवाब मलिकांच्या जामिनासाठी ३ कोटींची मागणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कुर्ला(Kurla) येथील जमीन व्यवहारमध्ये ईडीने (ED) नवाब मलिक यांचे दाऊदशी (Dawood) संबध असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई केली होती. दरम्यान, ह्या प्रकरणातील त्यांचा जामीन 16 मार्च रोजी न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना कोठडीतच राहावे लागणार आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांचा जामीन मॅनेज करून देतो असं सांगणारा एक फोन नवाब मलिक यांच्या मुलाला आला होता. जामीनाच्या बदल्यात 3 कोटी रुपयांची मागणी ह्या फोनद्वारे करण्यात आली. ही सर्व रक्कम बीटकॉईन्सच्या (bitcoins) (Crypto currency) स्वरूपात हवी आहे. असं ह्या फोनकॉलवर सांगण्यात आलं. हा फोन इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीने केला असल्याचे समजतंय.
ह्या सर्व प्रकाराबाबत नवाब मलिक यांच्या मुलाने विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वकील आमीर मलिक यांच्याद्वारे ही तक्रार दाखल करण्यात आल्याचं समजतंय.