nawab malik
nawab malikteam lokshahi

Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणी आता मलिकांची होणार चौकशी

बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या चौकशीच्या मागणीसाठी मुंबई पोलीसांना परवानगी देण्यात आली आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण ( Phone tapping ) केल्याच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab malik) यांच्या चौकशीच्या मागणीसाठी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र आता फोन टॅपिंग प्रकरणात नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याची मुंबई पोलीसांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पोलीस सायबर सेलमार्फत करणार चौकशी करणार आहेत.

सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) मंगळवारी विशेष न्यायालयात अर्ज करून मलिक यांची फोन टॅपिंगप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. फोन टॅपिंगशी संबंधित कागदपत्रांचा एक संच मलिक यांच्याकडे होता. याच कागदपत्रांचा समान संच शुक्ला यांनी कथितरित्या उघड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मलिक यांची चौकशी करायची असून त्यासाठी परवानगी देण्याची मागणी सायबर पोलिसांनी केली आहे. मात्र आता बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणातील तपासात नवाब मलिकांच्या चौकशीची परवानगी मिळवण्याकरिता मुंबई पोलीसांनी मुंबई सत्र न्यायालयात केलेला विनंती अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

nawab malik
ATM मधून 500 काढताच निघू लागले 2500, आता वसुली होणार

काय होता रश्मी शुक्ला यांच दावा?

'फोन टॅपिंगचा गोपनीय अहवाल दवेंद्र फडणवीस यांनी नाही तर महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी उघड केला. असा प्रतिआरोप रश्मी शुक्ला यांच्यावतीनं ॲड. महेश जेठमलानी यांनी गुरूवारी हायकोर्टात केला होता. तसेच रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सुरू असलेली चौकशी ही एकतर्फी आणि राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याचा दावा करण्यात आला. रश्मी शुक्ला यांनी एसआयटी सोडल्यानंतर तिथून कुठलाही कागद, अहवाल अथवा पेन ड्राईव्ह सोबत नेलेला नाही त्यामुळे त्यांची चौकशी होण्याचा प्रश्नचं उद्भवत नाही असा दावा रश्मी शुक्ला यांच्यावतीनं करण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com