Navneet - Ravi Rana
Navneet - Ravi Rana

Navneet - Ravi Rana : अखेर राणा दाम्पत्यांनी आंदोलन घेतले मागे, 'हे' सांगितले कारण

Published by :
Published on

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केली आहे.

आमचा आग्रह हनुमान चालिसासाठी होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही स्वताहून हे आंदोलन मागे घेत आहोत, असे रवी राणा यांनी सांगितले.

बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, असा चिमटा देखील राणा यावेळी काढला. तसचे भगवान राम आणि हनुमानाचा यांनी अवमान केला आहे. राम भक्त आणि हनुमान भक्त यांना धडा शिकवतील, असंही ते म्हणाले.भगवान राम आणि हनुमानाचा यांनी अवमान केला आहे. राम भक्त आणि हनुमान भक्त यांना धडा शिकवतील, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत

आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरावर हल्ला झाला. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठं होती. पवारांच्या घरावर हल्ला होतो यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येतं. आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर आता काय कारवाई करणार हे पाहणार आहे, असं राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले. आमच्या घरात शिवसैनिक घुसले, पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत, असंही राणा म्हणाले.

“आत्ता जर काही लोक भजन आणि हनुमान चालीसा वाचत आहेत, तर ते हनुमान जयंतीच्या दिवशी वाचलं असतं किंवा आज आमच्यासोबत वाचलं असतं तर त्यांना काय अडचण होती? मला वाटतंय मुख्यमंत्र्यांना फार इगो आहे. एखाद्या माणसाचा इगो आणि हिटलरशाही डोक्यावर जाते, तेव्हा जनता त्यांना धडा शिकवत असते”, असं देखील रवी राणा यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com