मुख्य वनरक्षक रेड्डी यांचे समर्थन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासदार नवनीत राणांनी फटकारले

मुख्य वनरक्षक रेड्डी यांचे समर्थन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासदार नवनीत राणांनी फटकारले

Published by :
Published on

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून मेळघाटातील हरीसार येथे आरएफओ दीपाली चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणातील डीएफओ विनोद शिवकुमार आणि मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची नावे समोर आली आहेत. या दोघांच्या समर्थनार्थ काही वनकर्मचारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे आले होते. त्यांना खासदार राणा यांनी फटकारले.

डीएफओ विनोद शिवकुमार यांनी त्रास दिल्याचे सुसाईड नोटमध्ये दीपाली यांनी लिहिले होते. याबाबत मुख्य वनरक्षक श्रीनिवास रड्डी यांच्याकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, असेही या पत्रात म्हटले आहे. पोलिसांनी शिवकुमार यांना अटक केली आहे. तथापि, मेळघाटातील महिला वनकर्मचारी व अधिकारी हे या दोघांच्या समर्थनार्थ बडनेरा येथे आले होते. रेड्डी व शिवकुमार किती चांगले अधिकारी आहेत, हे सांगणारे निवेदन त्यांना देण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांनी केला. तेव्हा नवनीत राणा यांनी धारेवर धरले.

मी वारंवार रेड्डी यांच्याकडे दीपाली चव्हाण यांच्या मानसिक त्रासाबद्दल वारंवार तक्रार केली, पण त्यांनी ऐकून घेतले नाही. असे असतानाही, तुम्ही त्यांचे समर्थन करता हे चुकीचे असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या आणि या दोघांच्या समर्थनार्थ निवेदन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना राणा यांनी हाकलून लावले.

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार
खासदार नवनीत राणा यांनी अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. सुसाईड नोटमध्ये उल्लेख असतानाही गुन्हे दाखल का करत नाही, असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com