Navneet Rana - Ravi Rana
Navneet Rana - Ravi RanaTeam Lokshahi

Navneet Rana Nagpur : राणा दांपत्याच्या रॅलीवर निर्बंध

राष्ट्रवादी पक्षालाही स्पीकरविना सुंदरकांड वाचनाची परवानगी
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी घराबाहेर पडलेलं राणा दाम्पत्य अर्थात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) आज 36 दिवसांनी अमरावतीत परतणार आहे. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरुन राजकीय रामायण पाहायला मिळू शकतं. कारण दिल्लीहून नागपुरात परतल्यावर राणा दाम्पत्य रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा (Rana couple hanuman chalisa recite at nagpur) पठण करणार होते. मात्र आता राणा दाम्पत्याला नागपूर विमानतळ ते हनुमान मंदिर रॅली काढण्याची परवानगी नाकारण्यात आली. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.

Navneet Rana - Ravi Rana
पोलिस बदल्यांच्या यादीवर बोगस, वाळू तस्कर, गुड, बरा असा शेरा : काय आहे प्रकार?

तर हनुमान चालीसा पठणासाठी मंदिरात परवानगीची गरज नसते, पण काही अटी आणि शर्तीच्या आधारे एनओसी देण्यात आल्याचे ते म्हणाले, तर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं परवानगी मागितली होती. त्यांनासुद्धा स्पीकर वापरता येणार नसल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले. नियमाच्या आधीन राहून मंदिराच्या परिसरात हनुमान चालीसा आणि सुंदर कांड पठणाची परवानगी पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.

Navneet Rana - Ravi Rana
Save Soil Movement : 'माती वाचवा' मोहीमेला मुंबईच्या MCGM मुख्यालयाचा पाठिंबा

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक वक्तव्य करू नये, ही अटही पोलिसांनी घातली आहे. यासठी राष्ट्रवादीला 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. लाऊडस्पीकरचा वापर करु नये, मंदिरासमोर अवास्तव गर्दी जमवू नये, प्रक्षोभक वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com