सरकारला १५ ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम; अन्यथा विमानतळाचे काम बंद पाडणार

सरकारला १५ ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम; अन्यथा विमानतळाचे काम बंद पाडणार

Published by :
Published on

सिद्धेश म्हात्रे । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकर्‍यांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आज 9 ऑगस्ट क्रांतिदिनी भूमीपुत्रांनी मशाल मार्च काढण्यात आला होता. या मार्चच्या माध्यमातुन सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास विमानतळाचे काम बंद पाडणार, असा इशाराच प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

आज 9 ऑगस्ट क्रांतिदिन या निमित्त दि. बा. पाटील यांच्या ज्वलंत विचारांची ज्योत सर्वत्र प्रज्वलित करत मशाल मार्च काढण्यात आला. नवी मुंबईतील सर्व 29 गावांसह ठाणे रायगड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हा मशाल मार्च काढण्यात आला. या मशाल मार्चच्या माध्यमातून राज्य सरकारकडे दिबांच्या नावाची मागणी करण्यात आली. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव न दिल्यास 16 ऑगस्ट पासून विमानतळाचे काम बंद आंदोलन करण्यात येणार असा इशाराच प्रकल्पग्रस्थानीं राज्य सरकारला दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com