महाराष्ट्र
पुनर्वसनाच्या मागणीसाठी करवीर तालुक्यात आंदोलन
महापुराने कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील शिये गाव नेहमी बाधित होत असते. यामुळे शिये गावसह अजूबाजूच्या गावांचे मोठे आर्थिक नुकसान होत. म्हणून शासनाने पूरग्रस्त असणाऱ्या शिये गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंचगंगा नदीपात्रात जवळ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी अचानक पंचगंगा नदीपात्रात उतरून पाण्यात उड्या टाकल्या. तरी देखील घोषणाबाजीही सुरू होती. क्षणाचा विलंब न लावता पोलिसांनी देखील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उडी टाकलेल्या आंदोलकांना बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून भविष्यात पाण्यात आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.