नितेश राणेंच्या आरोपानंतर नाशिक पोलिसांची कारवाई; व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या युवकाला घेतलं ताब्यात
विधानसभेत बोलताना नितेश राणे यांनी एक फोटो दाखवत सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? असा सवाल विचारत फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. नितेश राणे म्हणाले की, १९९३ चा बॉम्बब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील आरोपी सलिम कुत्ता हा पेरोलवरती असताना तो पार्टी करतो. उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो. हे गंभीर आहे. याला पाठींबा कोणाचा आहे? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
याच पार्श्वभूमीवर आता काही मिनिटातच नाशिक पोलीस सतर्क झाली असून उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयातून पवन मटाले नामक व्यक्तीला गुन्हे शाखे युनिट दोनने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
सलीम कुत्ता पेरोलवर असताना पार्टी कसा करु शकतो. दाऊदचा सहकाऱ्यासोबत पार्टी करण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यात आणखी कोणाचा संबंध आहे का याची चौकशी केली जाईल. या कुत्ताशी त्या व्यक्तीचा संबंध काय?एसआयटीच्या माध्यमातून वेळेत चौकशी केली जाईल. या संबंधित व्यक्तीशी कुत्ताचा काय संबंध आहे. याची चौकशी करण्यात येईल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.