महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला?

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला?

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती आहे.
Published by :
shweta walge
Published on

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती आहे. इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रकल्प असल्याची माहिती असून महिंद्रा कंपनीचे मदर युनिट नाशिकमध्ये आहे तर प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रकल्प असल्याची माहिती असून महिंद्रा कंपनीचे मदर युनिट नाशिकमध्ये आहे तर प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे. प्रारंभी हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाण्याची होती चर्चा होती, मात्र मात्र नंतर हा प्रकल्प अचानक गुजरातला उभारण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक संघटना आक्रमक झाली आहे.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत इलेक्ट्रॉनिक पार्टस, बॅटरी प्रकल्पासाठी २५ हजार कोटींचा करार शासनासोबत करण्यात आला आहे. हा प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीची बातमी सुद्धा आली आहे. अत्यंत खेदजनक अशी ही बातमी नाशिककरांसाठी आहे. गेल्या वर्ष आणि दोन वर्ष महाराष्ट्रातील मोठी गुंतवणूक गुजरातला जात आहे. नाशिककरांची मोठ्या प्रकल्पाची मागणी असूनही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या या युनीटमध्ये सर्व मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकमध्ये असल्यामुळे हा प्रकल्प नाशिकमध्येच रहावा, अशी मागणी औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com