संगळ्यांना मी पुरून उरलोय; नारायण राणेंचं थेट आव्हान

संगळ्यांना मी पुरून उरलोय; नारायण राणेंचं थेट आव्हान

Published by :
Published on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि २४ ऑगस्टला अटक केल्यानंतर उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.

"दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे, असे नारायण राणे म्हणाले.

"मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो." असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

" ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे." असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com