माझं कुटुंब-माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री फेल म्हणतं नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

माझं कुटुंब-माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री फेल म्हणतं नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

Published on

राज्यात कोरोना रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी लॉकडाऊनला मोठा विरोध दर्शवला आहे. खासदार नारायण राणेंनीही पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर जबरी प्रहार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहेत. कोरोना सुरु झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली होती. माझे-कुटुंब माझी-जबाबदारी, पण ही घोषणा म्हणणारे मुख्यमंत्री जबाबदारी पेलण्यात अपयशी ठरले आहेत. कारण, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबालाच कोरोना झाला आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलाला कोरोना झाला होता, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांचं धोरणच चुकीचं आहे, त्यामुळे राज्यात कोरोना वाढल्याचा आरोपही राणेंनी केला.

संपूर्ण राज्यातून लॉकडाऊनला विरोध होत आहे, व्यापाऱ्यांकडून उठाव झाला आहे. त्यामुळे, हे जागे झाले आहेत. नागरिकांना मान सन्मान देऊन बोलायला हवं, पण धमक्या दिल्या जात आहेत. लॉकडाऊन करण्याच्या धमक्या दिल्या जातात, पण गरिबांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाबद्दल काहीही बोलत नाही. मी मातोश्रीवर बसतो, तुम्हीही तुमच्या घरात बसा, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, तुमची जेवायची सोय होते, पण लोकांनी काय खायचं? मुलांना शिकवायचं कसं? दोन वेळेचे जेवणाचं पॅकेट मुख्यमंत्री लोकांच्या घरी पाठवणार आहेत का?, असे म्हणत नारायण राणेंनी लॉकडाऊनला आपला विरोध दर्शवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com