Narayan Rane Arrested | नारायण राणेंना जामीन मंजूर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर नारायण राणेंना जामीन मंजूर झाला आहे. रायगड गुन्हे शाखेत दोन दिवस हजेरीला जावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नारायण राणे यांना महाड कोर्टात हजर करण्यात आले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू झाली आहे.अॅड. शिरोडकर राणेंची बाजू मांडत आहे. तर अॅड. प्रकाश जोशी सरकारी वकील आहेत.
सुनावणीतील अपडेट
- सरकारी वकील – नारायण राणे जबाबदार व्यक्ती असताना बेजबाबदारीने का वागले , कुणाच्या सांगण्या वरून असे वक्तव्य केले.
- सरकारी वकील युक्तीवाद संपला.
- शिरोडकर नारायण राणे यांचे वकील बोलत आहेत.
- दंडाधिकाऱ्यांकडे नारायण राणेंच्या जामीनाची मागणी
- पोलीस तपासासाठी दिलेली कारणे योग्य नाहीत
- मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दाखले सादर
- युक्तीवाद सुरू आहे
- नोटीस दिल्या शिवाय अटक करता येत नाही
- राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलीसांनी कोणतीही लेखी नोटीस दिलेली नाही
- युक्तिवाद संपले
- काही वेळातच निकाल