‘कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार’

‘कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार’

Published by :
Published on

महाराष्ट्राचं शोषण करणारं हे सरकार असून कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपण लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

सध्याचं सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं असून त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड करणार असल्याचा खुलासाही नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला. संजय राऊत, महाविकास आघाडी यांच्या कारभारावर त्यांनी कडक भाषेत ताशेरे ओढले आहेत.

सरकारनं लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केलं नाही. ना लसी आहेत, ना व्हेंटिलेटर्स आहेत. काहीच नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. जनाची नाही तर मनाचीही नसलेलं हे सरकार असून ते मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचंच नसल्याची कठोर टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा हा नौटंकी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी कोकणला काहीही दिलं नाही, कोकणच्या विकासासाठी काहीही केलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com