Parambeer Singh | कथित वसुली प्रकरणात नंदकुमार गोपाले, आशा कोरकेंना सीआयडी कोठडी

Parambeer Singh | कथित वसुली प्रकरणात नंदकुमार गोपाले, आशा कोरकेंना सीआयडी कोठडी

Published by :
Published on

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि निरीक्षक आशा कोरके यांना सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. रिअल इस्टेट व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी 22 जुलै रोजी त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना सीआयडीने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. आरोपींनी पैशांचा व्यवहार केल्याचे सबळ पुरावे सीआयडीच्या हाती लागले होते. सीआयडीकडून दोन्ही आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपींनी तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच मकोका अंतर्गत कारवाई न करण्यासाठी 50 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. यातील मुख्य आरोपी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात नाँन बेलेबल वॉरंट जारी केलंय. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपींना 7 दिवसा़ंची कोठडी सुनावलीय.

या दोन अधिकाऱ्यांपैकी एक पोलीस अधीक्षक नंदकुमार गोपाळे हे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात तर पोलीस निरीक्षक आशा कोरके हे नायगाव येथे तैनात आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रिअल इस्टेट व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी 22 जुलै रोजी त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये परमबीर सिंग यांच्यासह सात जणांची नावे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com