“ग्लोबल टेंडर असफल होण्यामागे मोदी सरकारचा दबाव”

“ग्लोबल टेंडर असफल होण्यामागे मोदी सरकारचा दबाव”

Published by :
Published on

मुंबई महानगरपालिकेने लसीकरणासंदर्भात ग्लोबल टेंडर काढले होते. यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. सात कंपन्यांनी रुची दाखवल्यानंतरही ग्लोबल टेंडर संदर्भात प्रक्रिया रद्द करावी लागली. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली आहे.

लस जागतिक निविदा प्रक्रिया रद्द होण्यामागे केंद्र सरकारचे राजकारण असल्याची पटोले यांनी चंद्रपुरात केली आहे. राज्य आणि मुंबई महापालिकेची जागतिक निविदा प्रक्रिया असफल ठरण्यामागे केंद्राचे राजकारण आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी 75 % लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र सर्वांना मोफत लस मिळावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचे पटोलेंनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशातील सत्तेचा दबाव असतोच. तसा यावेळी देखील होताच, असंही त्यांनी म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com