शेतकऱ्याची ‘ऑनलाईन’ फसवणूक करणारे गजाआड

शेतकऱ्याची ‘ऑनलाईन’ फसवणूक करणारे गजाआड

Published by :
Published on

शेतकऱ्यांचा माल ऑनलाईन पद्धतीने विकत घेण्याचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा 24 तासात पर्दाफाश करण्यात आला आहे. नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलिसांनी ही कामगिरी बजावली आहे.

अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगेवाडी या गावचे शेतकरी अमोल दगडू परे यांचे डाळिंब ऑनलाईन खरेदी केले. यानंतर त्यांना नालासोपाऱ्यात बोलावून त्यांच्याकडून 87 हजार 800 रुपयांचे 112 कॅरेट डाळिंब विकत घेतले. त्यांना पैसे न देता फिरवा फिरवी करून, त्यांची दिशाभूल करत आरोपी फरार झाले होते.

आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर तुलिंज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून तुलिंज पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन घेऊन, अवघ्या 24 तासात मालासह टेम्पो आणि 2 आरोपींना गजाआड केले. या दोन्ही आरोपींना वसई न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकाश उमेश चौधरी (वय 25), मोहम्मद अजय सलीन रायनी (वय 29) असे अटक आरोपींचे नाव असून हे राहणारे वसई चे आहेत.

कोरोना महामारीच्या काळात जीवनावश्यक वास्तुसह अन्य गरजेच्या वस्तू ह्या ऑनलाईन खरेदीवर नागारीकांचा भर आहे. तसेच व्यापारी, शेतकरी ही आपला माल हा ऑनलाईन विक्रीवर सर्वाधिक भर देत आहेत. पण प्रत्येक व्यापारी आणि शेतकऱयांनी आपला माल विकताना तो खरेदी करणारा व्यापरिच आहे का याची माहिती करूनच घ्यावी, तेव्हाच माल द्यावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com