अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातचा डॉ. बालाजी किणीकर यांना पाठिंबा

अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातचा डॉ. बालाजी किणीकर यांना पाठिंबा

अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातने महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांना अधिकृत पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे ३५ हजार मुस्लिम मतदारांचा पाठिंबा महायुतीला मिळणार आहे.
Published by :
shweta walge
Published on

थो़डक्यात

  • मुस्लिम जमातने महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांना अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे, ज्यात १३ पैकी ११ ट्रस्टींच्या सह्या आहेत.

  • अंबरनाथमध्ये मुस्लिम समाजाचे जवळपास ३५ हजार मतदार आहेत, आणि मुस्लिम जमात सक्रियपणे डॉ. किणीकर यांचा प्रचार करणार आहे.

  • मुस्लिम जमातचे कार्याध्यक्ष डॉ. झुबेर शाह यांनी सांगितले की, समाजाच्या वतीने हा पाठिंबा महायुतीचे उमेदवार डॉ. किणीकर यांना दिला आहे.

अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातने महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांना अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केला आहे. मुस्लिम जमातच्या १३ पैकी ११ ट्रस्टींच्या सह्या असलेलं पत्र मुस्लिम जमातचे कार्याध्यक्ष डॉ. झुबेर शाह यांनी डॉ. बालाजी किणीकर यांना दिलं आहे.

अंबरनाथ शहरात मुस्लिम समाजाचे जवळपास ३५ हजार मतदार आहेत. मात्र मुस्लिम जमातने अद्याप २२ पैकी कोणत्याही उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. आता मुस्लिम जमातच्या ट्रस्टींनी पत्रकार परिषद घेत महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांना आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. इतकंच नव्हे, तर बालाजी किणीकर यांचा सक्रियपणे प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आम्हाला समाजानेच निवडून दिलं असून त्यामुळे आम्ही समाजाच्या वतीने हा पाठिंबा महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांना जाहीर करत असल्याचं मुस्लिम जमातचे कार्याध्यक्ष डॉ. झुबेर शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

या पत्रकार परिषदेला मुस्लिम जमातचे कार्याध्यक्ष डॉ. झुबेर शाह यांच्यासह ट्रस्टी उपस्थित होते. तर पत्रावर अध्यक्ष सलीम चौधरी, हबीब सौदागर, मकबूल खान, आरिफ काझी, चांद शेख, डॉ. जावेद शेख, रईस खान, असलम खान, मोहम्मद कातल शेख, असीम पटेल यांच्या सह्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com