कट्टर हिंदुत्ववादी भिडेंवर मुस्लीम डॉक्टरांनी केले उपचार? मात्र डॉक्टरांनी केला अजबच खुलासा
संजय देसाई, सांगली
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर नुकत्याच झालेल्या अपघातात डॉ. रियाज मुजावर (Dr Riyaz Mujawar) या मुस्लिम डॉक्टराने उपचार केल्याची चर्चा सोशल मिडीयावर सूरू आहे. या सोशल चर्चेत संभाजी भिडेंवर टीका होतेय, तर डॉ. रियाज मुजावर (Dr Riyaz Mujawar) यांच्यावर मुस्लिम समाजाकडून कौतूक होत आहे. मात्र या मागचं खर कारण आता समोर आले आहे.
सोशल पोस्टमध्ये काय ?
मुस्लिम द्वेष शिकवणाऱ्या संभाजी भिडेंच्या (Sambhaji Bhide) खुब्याचे ऑपरेशन डॉ रियाज मुजावर (Dr Riyaz Mujawar) यांनी केले आहे. यावेळी त्यांना मुंबईत वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उतुंग कार्यासाठी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार होता. मात्र त्यांनी या सोहळ्याला गैरहजर राहून आपले कर्तव्य बजावले, अशी त्यांच्या बाजूने कौतूकास्पद पोस्ट लिहली गेली आहे. तर संभाजी भिडेंवर (Sambhaji Bhide) टीका करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय ?
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा काहीच दिवसांपुर्वी सायकल वरुन तोल जाऊन अपघात झाल्याची घटना घडली होती. यामध्ये त्यांच्या गुडघ्याच्या खुब्याला मार बसला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर डॉ. देशपांडे नामक डॉक्टराने शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रिये दरम्यान त्यांचा बीपी कमी जास्त झाल्याने हृदय रोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर (Dr Riyaz Mujawar) यांनी त्यांची तपासणी केली होती. या दरम्यानचं त्यांना मुंबईत वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उतुंग कार्यासाठी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार होता. मात्र त्यांनी या सोहळ्याला गैरहजर राहून दोन दिवस संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर लक्ष ठेवून होते.
या घटनेनंतर आता सोशल मीडियावर हिंदुत्ववादी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर टीका होत आहे, तर डॉ. रियाज मुजावर (Dr Riyaz Mujawar) यांनी उपचार केल्याची अफवा पसरली जात आहे. तसेच एका मुस्लिम डॉक्टराने उपचार केल्याने त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
डॉ. रियाज मुजावर यांचा खुलासा
दरम्यान या सर्व प्रकरणावर आता डॉक्टर मुजावर (Dr Riyaz Mujawar) यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून आपली बाजू मांडलेली आहे. मला 27 एप्रिल 2022 रोजी संभाजी भिडे गुरूजी यांच्या ऑपरेशनच्या पुर्वतपासणीसाठी बोलावले गेले. 28 एप्रिल रोजी सकाळी त्यांचे ऑपरेशन ऑर्थोपेडीक डिपार्टमेंट भारती हॉस्पीटल सांगलीमध्ये झाले. यानंतर पुढील 48 तास गुरूजींना कार्डीओलॉजी युनिटमध्ये अंडर देखरेखीखाली ठेवले होते. माझ्यावर असलेल्या नैतिक जबाबदारीमुळे मी 28 व 29 एप्रिल 2022 रोजी मिरजमध्ये राहणे योग्य समजले, असा खुलासा रियाज मुजावर (Dr Riyaz Mujawar) यांनी केला.
कृपया या घटनेचा कुणीही धर्म, जाती व इतर राजकीय कारणास्तव वापर करू नये, असे आवाहन देखील यावेळी हद्यरोगतज्ञ डॉ. रियाज उमर मुजावर (Dr Riyaz Mujawar) यांनी केले.