Murlidhar Mohol : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे

Murlidhar Mohol : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे

पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं अशी विनंती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सरकारला केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं अशी विनंती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सरकारला केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. अशी माहिती मिळत आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे’ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, यासंदर्भात मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत.विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होतं, म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे.

पुण्याचं विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होतं. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com