फलटणमध्ये युवकाचा अज्ञातांकडून खून

फलटणमध्ये युवकाचा अज्ञातांकडून खून

Published by :
Published on

प्रशांत जगताप | साताऱ्यातील फलटण तालुक्यात 21 वर्षीय तरुणाचा अज्ञातांकडून खून केल्याची घटना घडली आहे. शकील अकबर शेख या 21 वर्षीय तरुणाचा नाव आहे. दरम्यान या तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा झाला असून घटनेचा पोलिस तपास करीत आहेत.

फलटण तालुक्यातील पिंपळवाडी गावाच्या होळ हद्दीमध्ये शकील अकबर शेख या 21 वर्षीय तरुणाचा अज्ञाताकडून खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. होळ प्लॉट नावाच्या शेताच्या चारीमध्ये मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृत युवकाच्या सासरवाडीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी तलवारीच्या भांडणांमधे या युवकावर हल्ला झाला होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे आणि फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पाहणी करून पंचनामा केला असून आरोपीच्या शोधात पोलीस रवाना झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com