तिसऱ्या पत्नीसोबत फोनवर बोलणाऱ्याची हत्या, गुन्हे शाखेने आरोपीस 48 तासात केली अटक

तिसऱ्या पत्नीसोबत फोनवर बोलणाऱ्याची हत्या, गुन्हे शाखेने आरोपीस 48 तासात केली अटक

भिवंडीत 8 नोव्हेंबर रोजी अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील निर्जन ठिकाणी झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकावलेला आढळून आला होता.
Published by :
shweta walge
Published on

भिवंडीत 8 नोव्हेंबर रोजी अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील निर्जन ठिकाणी झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकावलेला आढळून आला होता. त्याबाबत नारपोली पोलिस ठाणे येथे अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मयत इसमाची ओळख पटवली.

सद्दाम इसहाक हुसेन, वय 19 वर्षे, रा.कामतघर, असे निष्पन्न झाले. नंतर घटनास्थळ स्व परिसरात लावलेली सीसीटिव्ही तपासले असता. सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर,वय 40 वर्षे, रा.कामतघर याचे नाव पुढे आले. त्याच्या तिसऱ्या पत्नीसोबत मयत इसम सद्दाम हुसेन हा मोबाईल वर बोलत होता व त्यामुळेच आपली पत्नी उत्तर प्रदेश येथे निघून गेल्याच्या रागातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली.

भिवंडी गुन्हे शाखेचे पथक आरोपीस पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे दाखल झाले. जौनपुर येथील बक्सा पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर यास भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 48 तासात अटक केली.

आरोपी सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर हा सराईत गुन्हेगार असून भिवंडी सह कल्याण नवी मुंबई या भागात त्या विरोधात चोरी,घरफोडी, जबरी चोरी अशा 25 गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे आरोपी हा उत्तरप्रदेश येथे असलेल्या आपल्या तिसऱ्या पत्नीची सुध्दा हत्या करण्यासाठी उत्तरप्रदेश येथील मुळ गावी निघाला होता अशी कबुली आरोपीने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com