Mumbai local Mega block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai local Mega block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, 3 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

Mumbai Local Mega Block: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, 3 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा. रेल्वे प्रवासाचं नियोजन करून घ्या आणि त्यानंतरच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही मेगाब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वे -

स्थानक- माटुंगा- मुलुंड

मार्ग- अप आणि डाउन जलद मार्गावर

वेळ- सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

Mumbai local Mega block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Mira-Bhayandar: घाणेरड्या पाणीपुऱ्या बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेची कारवाई

हार्बर रेल्वे -

स्थानक- सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग- अप आणि डाउन मार्गावर

वेळ- सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेल करता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. याशिवाया पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 8 दरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com