महाराष्ट्र
Mumbai : मुंबईची पाणीकपात आजपासून मागे
मुंबईची पाणीकपात आजपासून मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईची पाणीकपात आजपासून मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा घटला होता. त्यामुळे पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता.
आता ही पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. सातही धरणांत 10 लाख 56 हजार 157 दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस पडल्यामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 29 जुलैपासून मुंबईकरांवरील 10 टक्के पाणी कपात मागे घेण्यात येणार आहे.