मुंबई ते नागपुर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विचार सुरू;केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

मुंबई ते नागपुर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विचार सुरू;केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Published by :
Published on

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात महत्वाचं विधान केल आहे.मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-वाराणसी या बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणेच मुंबई ते नागपुर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे.

रेल्वे राज्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर दानवे यांनी पहिल्यांदाच मतदार संघाचा दौरा केला.औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली होती. दानवेंनी याच पत्रकार परिषदेत बुलेट ट्रेन संदर्भात महत्वाचं विधान केलं

मुंबई-औरंगाबाद प्रवास फक्त दिड तासात

याच दरम्यान हा प्रकल्प पार पडला तर मुंबई- औरंगाबाद अंतर फक्त दिड तासात गाठता येणार आहे.तर फक्त तीन ते साडेतीन तासात मुंबईहुन नागपुरला पोहचता येणार आहे.त्यासाठीच या प्रकल्पासाठी गांर्भीर्याने विचार सुरू आहे. असे दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com