Mumbai Rain Update | कोकणात जाणारी मुंबई मडगाव एक्स्प्रेस रद्द

Mumbai Rain Update | कोकणात जाणारी मुंबई मडगाव एक्स्प्रेस रद्द

Published by :
Published on

शनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्यानं लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे कोकणात जाणारी मुंबई मडगाव एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून राज्यात पुढील पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी १५ ते २० मिनिटं लोकल सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, आता विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

दिवसभात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेरुळांवर पाणी साचत असल्याने कोकणात जाणारी आणखी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. ०११११ मुंबई मडगाव स्पेशल ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे. उद्या सकाळी (२० जुलै) ७ वाजून १० मिनिटांनी ही गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com