Mumbai Rain Update | मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी धोका वाढला, हवामान विभागाचा इशारा
मागील तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुख्य शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाने रौद्र रुप धारण केल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे.
दरम्यान रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर उतरल्याने काही प्रमाणात पाण्याचा निचरा झाला होता. मात्र, चार वाजेनंतर पुन्हा पावसाने जोर पकडला असून, हवामान विभागाने मुंबईसह चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील तीन तास धोक्याचे असणार आहेत.
मुंबईत मागील २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी (१७ जुलै) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, मुंबईतील जनजीवन कोलमडलं आहे. रविवारी सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत रेल्वेसह वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला झाल्याचं दिसून आलं.
मात्र, मुंबई, उपनगरांसह शेजारील जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तास या चारही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.