Dasara Melava: शिवसेना, शिंदे गटाच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज
उद्या मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. दोन्ही गटाचे लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्याच पार्शवभूमीवर मुंबई पोलीस देखील सज्ज झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वांद्रे येथील बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क दादर या ठिकाणी होणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. दसऱ्याला देवीचं विसर्जन असल्यामुळे 20 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते मेळाव्याला येणार असून वादविवाद व कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी देवी विसर्जन देखील आहे आणि सामान्य नागरिकांना हि त्रास होता कामा नाही यांची दक्षता ग्यावी आणि त्या प्रमाणे बंदोबस्तची नियोजन करावे, असे पोलीस उपआयुक्तांनी सांगितलेय. सोबतच बंदोबस्त करत असताना हलगर्जीपणा करु नका तसेच मेळाव्यात पक्षपातीपणा करु नका, असा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. पोलीस उप आयुक्त संजय लाटकर यांनी परिपत्रक काढत पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत.
शिवाजी पार्क, दसरा मेळावा
2 डीसीपी
3 एसीपी
17 पोलीस निरिक्षक
60 एपीआय/पीएसआय
420 पोलीस कर्मचारी
- 65 पोलीस हवालदार
- 2 RCP प्लॅटून
- 5 सुरक्षा बल पथक
- 2 QRT शीघ्र कृती दल
- 5 मोबाईल वाहने
बीकेसी, दसरा मेळावा
4 डीसीपी
4 एसीपी
66 पोलीस निरिक्षक
217 एपीआय/पीएसआय
1095 पोलीस कर्मचारी
410 पोलीस हवालदार
8 RCP प्लॅटून
5 सुरक्षा बल पथक
5 शीघ्र कृती दल
14 मोबाईल वाहनं