महाराष्ट्र
‘मुंबईत केवळ एक दिवसाचा लससाठा शिल्लक’
राज्यात मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी राज्यातील विविध जिल्ह्यातील लसीकरण थांबवण्यात आलं आहे. मुंबईतील २५ खासगी केंद्रांवरील लसीकरण थांबवण्यात आलं आहे. मुंबईत फक्त एक दिवसाचा लससाठी शिल्लक आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
लसीअभावी अनेक केंद्रांवरील लसीकरण थांबवण्यात आलं आहे. आपल्याकडे कमी साठा आहे. १ लाख ७६ हजार लस येत असल्याचं मला माध्यमांकडून कळालं आहे पण तेदेखील अपुरं पडणार आहे. कारण, दुसरा डोस घेणाऱ्यांचीच इतकी मोठी रांग आहे.
बीकेसीमध्ये केंद्राबाहेर लोकांची मोठी रांग लागली आहे. रुग्ण वाढत असताना लस घेऊन सुरक्षित राहावं, अशी लोकांची भावना आहे, असंही पेडणेकर यांनी सांगितलं.