‘लॉकडाउनबाबत अद्याप सूचना नाहीत’

‘लॉकडाउनबाबत अद्याप सूचना नाहीत’

Published by :
Published on

राज्यासह मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आम्हाला जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे तसंच कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

राज्यात कडक लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना पेडणेकर म्हणाल्या की, अद्याप मनपाला राज्य सरकारकडून लॉकडाउनसंदर्भात कुठल्याही सूचना आल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापूर्वी दिलेल्या आदेशावर आम्ही करत आहोत, असंही महापौर म्हणाल्या.

कोरोना नियमांचं पालन गरजेचं आहे. प्रत्येकजण लॉकडाउन नको म्हणत आहे. मग निर्बंध टाळायचे असतील तर नियम पाळावे लागतील. बेड्सची संख्या वाढवण्यात मनपाला यश आलं आहे. व्हेटिंलेटरचा तुटवडा नाही, असा दावाही महापौर यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com