BEST Super Saver Plan : तुम्ही ‘बेस्ट’ने प्रवास करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे अत्यंत महत्वाची

BEST Super Saver Plan : तुम्ही ‘बेस्ट’ने प्रवास करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे अत्यंत महत्वाची

Published by :
Published on

मुंबई | मुंबईत तुम्हाला रोजचा बस प्रवास करण्यासाठी आता मोबाईलच्या रिचार्जप्रमाणे प्लॅन निवडता येणार आहे. कारण बेस्ट प्रशासनानं प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी प्रवासाचे 72 सुपर सेव्हर प्लॅन जाहीर केले आहेत. दररोजच्या प्रवासाची गरज पाहून प्रवाशांना हे प्लॅन निवडता येतील. त्यामुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

बेस्टच्या या नव्या नियोजनानुसार, प्रवाशांना एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन करता येणार आहे. बेस्टने प्रवाशांसाठी पैसे बचत करणारे आणि हव्या त्या मार्गांवर प्रवास करण्याची मुभा देणारे 72 प्रकारचे वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. ही योजना बेस्टकडून लवकरच लागू होणार आहे.

काय आहे ही योजना? :

  • आपल्या प्रवासाच्या गरजा पाहून दररोज प्रवास करायचा आहे की, थोड्या दिवसांसाठी प्रवास करायचा आहे. याप्रमाणे आपला हवा तो प्लॅन आता निवडता येणार आहे. बेस्टचे मोबाईल अॅप आणि स्मार्टकार्डवरही योजना लवकरच लागू होणार आहे.
  • बेस्टच्या या योजनेत पैशाची बचत होणार असून एका फेरीसाठी अवघे 1.99 रुपये लागणार आहेत. या योजनेत बेस्टच्या नेटवर्कवर कुठेही हवा तसा प्रवास करण्याची किंवा निवडक भाडे टप्प्यात एसी किंवा नॉन-एसी बसनं प्रवास करण्याची मूभा राहणार आहे.
  • यामध्ये प्रवाशांना एका दिवसाच्या प्लॅनपासून 84 दिवसांच्या प्लॅनची निवड करता येणार आहे. तसेच 2 फेऱ्या ते 150 फेऱ्यापर्यंतची निवड करता येणार आहे. प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या भाडे टप्प्यानुसार कोणत्याही स्टॉपपासून कोणत्याही स्टॉपपर्यंत प्रवास करता येणार आहे.
  • दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेले विद्यार्थ्यांचे पास आणि अमर्यादित अंतराचे बस पास देखील या नवीन योजनेत कायम राहणार आहेत.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com