Mumbai Local । मुंबई लोकल ट्रेनबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकल प्रवास सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप यावर प्रशासकीय स्तरावर काहीच निर्णय झाला नाही आहे. दरम्यान लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याबाबत आता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकल प्रवास सुरु करा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह, विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीही करु लागली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई लोकल प्रवासाबाबत महत्वाचा निर्णय़ होण्याची शक्यता आहे. तशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्या याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री लोकल प्रवासाबाबत निर्णय घेऊ शकतात, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.