महाराष्ट्र
BMC Budget 2024: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार
मुंबई महापालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे.
मुंबई महापालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत सात मार्च 2022 रोजी संपली होती. गेल्या वर्षीचा 52 हजार 619 कोटींचा अर्थसंकल्प यंदा 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेत हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल बजेट सादर करणार आहे. पायाभूत सोयीसुविधांवर भर देत यासाठी तरतुदी होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा मिळतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.