नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या मुघल सम्राट शाहजहानचा 'या' दागिन्याची किंमत ऐकून व्हाल थक्क!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग सोहळ्यानंतर रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी या पुन्हा चर्चेत आहेत. त्यांचा प्रत्येक लूक हा खास आणि रॉयल असतो. साडी आणि आऊटफीट्समधील आकर्षक लूकमुळे आणि ज्वेलरीमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. 71 व्या मिस वर्ल्ड या स्पर्धेच्या फायनल प्रसंगी नीता अंबानी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या 71 व्या मिस वर्ल्ड फायनलच्या सोहळ्यात नीता अंबानी यांना प्रतिष्ठित ‘ब्युटी विथ अ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या लूकमधील मुघल बादशाहाची 'कलगी' म्हणून जगप्रसिद्ध असलेला दागिना हा त्यांच्या लूकची शोभा वाढवत होता.
या सोहळ्यासाठी नीता अंबांनी यांनी बनारसी जंगला साडी नेसली होती. त्याचसोबत मुघल बादशाहाची 'कलगी' म्हणून जगप्रसिद्ध असलेला दागिना त्यांनी परिधान केला होता. त्यांचा हा रॉयल लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महागड्या बाजूबंदची किंमत ही तब्बल २०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
टोपोफिलिया नावाच्या इंस्टाग्राम पेजनुसार, वापरण्यात आलेला मुघल सम्राटाचा शिखा 13.7 सेमी लांब आणि 19.8 सेमी रुंद आहे. हे सोन्यामध्ये हिरे, माणिक आणि स्पिनल्स घालून बनवले जाते. 2019 मध्ये या सुंदर दागिन्यांचा लिलाव झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. यापूर्वी ते एआय थानी कलेक्शनमध्ये दिसले होते.