एमपीएससीचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले दुसऱ्यांदा आला पहिला
मुंबई : राज्यसेवेच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर, शुभम पाटील दुसरा आला आहे. सोनाली मेत्रे हिने मुलींमध्ये पहिला तर राज्यातून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह 20 पदांच्या 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार प्रमोद चौगुले दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. याआधीही 2020 साली झालेल्या एमपीएससी परिक्षेत पहिला क्रमांक मिळवला होता. त्यावेळी प्रमोद चौगुलेला 612.50 गुण मिळाले होते. तर, यंदा त्याने 633 गुण मिळवले आहे. सध्या प्रमोद चौगुले उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे.
दरम्यान, एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु होते. अखेर मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून लागू करण्याचे जाहीर करुन विद्यार्थ्यांसमोरचा संभ्रम दूर केला आहे.