महाराष्ट्र
Video : ‘काय बाई सांगू? कसं ग सांगू’…खासदार उदयनराजेंनी व्यासपीठावरून गायले गाणे
प्रशांत जगताप, सातारा | सातारा नगर पालिकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन पर कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क व्यासपीठावरून गाणे गायले आहे. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आम्हाला नारळफोडी गॅंग असा उल्लेख केला असला तरी आम्ही कामे केली म्हणून नारळ फोडतो, एखाद्याच संपूर्ण घरदार उध्वस्त केलं नाही असे सांगत चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहे, मात्र धाडस पाहिजे असे प्रतिआवाहन खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना दिले आहे. कारण नसताना लहान मुलांसारखी वैयक्तिक टीका आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून सुरू असल्याचेही ते म्हणाले आहेत.
खासदार उदयनराजेंनी व्यासपीठावर "काय बाई सांगू? कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज" हे गायले गायले.. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला..