महाराष्ट्र
Supriya Sule Tests Positive for COVID 19 : खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन ही माहिती शेअर केली आहे. यात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केल आहे.