महाराष्ट्र
कोरोना लसीकरणात खारीचा वाटा; ‘या’ खासदाराने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत
राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला वेग मिळण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. महाराष्ट्रातील मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी खारीचा वाटा देण्यासाठीच्या भावनेतून त्यांनी ही मदत करत असल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपलं खासदारकीचं एक महिन्याचं वेतन दिलं आहे. महाराष्ट्रातील मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी खारीचा वाटा देण्यासाठीच्या भावनेतून हे करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.राहुल शेवाळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन खासदार राहुल शेवाळे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते.