Pune
PuneTeam Lokshahi

Pune : धक्कादायक! पोटच्या मुलाला दोन वर्षे कुत्र्यांसोबत कोंडले

पुण्यातील कोंढवा परिसरातील प्रकार
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे : कोंढव्यातील एका नवरा-बायकोने आपल्या पोटच्या ११ वर्षीय मुलाला तब्बल २२ कुत्र्यांसोबत (Dogs) दोन वर्षे डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्यांसोबत राहिल्याने या चिमुरड्याचेही वर्तन कुत्र्यांसारखे झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलांसाठी काम करणाऱ्या चाईल्ड लाईन (Child Line) या संस्थेच्या निदर्शनास हे प्रकरण आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस नवरा-बायकोविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाण्यात संजय लोधरिया (Sanjay Lodharia) आणि शीतल लोधरिया (Sheetal Lodharia) अशी आरोपींची नावे आहेत.

Pune
औरंगाबाद हादरलं! एकतर्फी प्रेमातून भरदिवसा विद्यार्थीनीचा खून

पुण्यातील कोंढव्यात कृष्णाई नावाच्या इमारतीमध्ये हे लोधरिया दाम्पत्य राहतात. त्यांनी आपल्या घरी तब्बल २२ वेगवेगळ्या प्रजातीची आणि वेगवेगळ्या वयोगटातील कुत्री पाळली आहेत. या कुत्र्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती. धक्कादायक प्रकार म्हणजे ज्या खोलीत कुत्री ठेवली आहेत तिथे एक ११ वर्षाच्या मुलाला परिसरातील अनेकांनी पाहिले असल्याची माहिती समोर आली होती. हा पीडित मुलगा खिडकीत बसून कुत्र्यासारखे हावभाव करत होता. एका व्यक्तीने चाईल्ड लाईन संस्थेच्या अपर्णा मोडक (Aparna modak) यांना कॉल करून या मुलाबाबत माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune
सुनेवर हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या

मोडक यांना सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्याने तातडीने तेथे धाव घेतली. यावेळी त्यांना एक अकरा वर्षांचा मुलगा एका खोलीत वीस ते बावीस कुत्र्यांसोबत आढळून आला. मोडक यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित मुलाच्या आई-वडिलांची आता पोलीस चौकशी करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, लोधरीया दाम्पत्य थोडेसे विक्षिप्त असून ते काही दिवसांपुर्वी एकदा परिसरातील रहिवासी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार घेऊन आले होते. आम्ही या २२ कुत्र्यांचे संगोपन करतो, असे या दोघांचे म्हणणे होते.

Pune
मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच पुण्यात शिवसेनेची खेळी

दरम्यान, सदर अकरा वर्षीय मुलाचे मेडिकल करून त्याच्यावर समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com