Monsoon Update: पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून उत्तर प्रदेशच्या वेशीवरच
साधारणत: आतापर्यंत काश्मीरला पोहोचणारा मान्सून १२ दिवसांपासून यूपी-बिहारच्या सीमेवर अडकला आहे. तो १७ जूनला मऊ जिल्ह्याजवळ पोहोचला होता, पण पाकिस्तानातून राजस्थानमार्गे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मॉन्सून पुढे सरकताना दिसत नाही. असे याआधी कर्नाटकातही झाले आहे. तिथे मान्सून १० दिवस अडकला होता. राज्यात अजून समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत.
हवामान तज्ज्ञांनुसार, बंगालच्या खाडीत हवेचा दाब थोडा कमी आहे. त्यामुळे मान्सूनला पुढे ढकलणारे वारे थांबले आहेत. मात्र, आता पश्चिमी वारे कमकुवत व्हायला लागले आणि बंगालच्या खाडीमार्गे वारे उत्तर-पश्चिमेकडे वाहत आहेत. त्यामुळे पुढचे दोन दिवस मानसून पुढे सरकायला लागेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास ८-१० दिवसांच्या आत मान्सून काश्मिरला पोहोचू शकतो. त्यानंतर तो राजस्थान पार करत संपूर्ण देशाला कव्हर करू शकतो. दक्षिण आणि इशान्येकडील राज्ये वगळता मान्सून आतापर्यंत कमकुवत राहिला. देशात १ ते २७ जूनदरम्यान सरासरी १५० मिमी पावसाची नोंद होते. यंदा १३५ मिमी झाली आहे. म्हणजेच १०% कमी.
आधी १० दिवस पाऊस कर्नाटकात अडकला, त्यामुळे उशिरा सरकत होता.
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमेवर मऊ येथे मान्सून अडकला आहे.
आसामात जलसंकट
आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. ३ लाखांवर लोक मदत छावण्यांत व रस्त्याच्या कडेला राहत आहेत. राज्याच्या ३२ जिल्ह्यांतील ५,४२४ गावांना पुराचा वेढा आहे. इथे सरासरीपेक्षा ८०% जास्त पाऊस झाला